अंबड पोलीस निरिक्षकाची पोलीस ठाण्यातच आत्महत्या
डोक्यात गोळी मारून संपवले जीवन ,कारणांचा शोध सुरू
सिडको: विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी आज सकाळी पोलीस ठाण्यातील त्यांच्या केबिनमध्ये सरकारी रिव्हलव्हर ने डोक्यात गोळी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे, आज सकाळी ते नेहमी प्रमाणे ड्युटी वर आले आणि केबिनमध्ये गेले, सकाळी रोल कॉल असतो, सर्व कर्मचारी बाहेर उभे होते, साहेब अजून का आले नाही म्हणून एक पोलीस कर्मचारी त्यांना बोलावण्यास गेला असता त्यांना नजन हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं दिसलं, लागलीच ही घटना वारिष्टना कळवण्यात आली, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही,