डॉ. राठी यांच्यावरील हल्ल्याचे कारण आले समोर
नाशिक: पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक
डॉ, राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचे कारण समोर आले आहे. हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या रोहिणी मोरे या माजी पीआरओचा पती राजेंद्र मोरे याने प्लॉटच्या आर्थिक व्यवहारातून हा हल्ला करण्यात आला असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. पोलीस मोरेचा शोध घेत आहे. शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास कोयत्याने हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात डॉ, राठी हे गंभीर जखमी झाले होते, त्यांना अपोला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लेखोर मोरे याची पत्नी ही डॉ, राठी यांच्या हॉस्पिटलमध्ये पीआर ओ होती, त्या ओळखीतून डॉ. राठी यांनी म्हसरूळ शिवारात मोरे यांच्या मदतीने एका प्लॉटचा व्यवहार केला होता. त्यासाठी डॉ. राठी यांनी पैसे दिले होते. या पैशातून डॉ.राठी यांचा मोरे याच्याशी वाद होऊन त्यातून हा हल्ला झाला.