चेष्टा मस्करी जीवावर बेतली,अल्पवयीन मुलाचा मारहाणीत मृत्यू

मारहाणीत अल्पवयीन मुलाचा मृत्यू
नाशिक:प्रतिनिधी

देवळाली कॅम्प येथील स्टेशनवाडी परिसरात मित्रांच्या आपसातील वादातून झालेल्या मारहाणीत १५ वर्षीय लवणीत किरणकुमार भगवाणे हा मुलगा मरण पावला. याप्रकरणी पाेलिसांनी अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एकास ताब्यात घेतले आहे.
मृत लवणीतचे नातलग आणि तक्रारदार प्रशांत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी रात्री सात वाजता ते मोबाईलवर खेळत असताना लवनीत आणि इतर संशयित खेळत हाेते. त्यावेळी सुमित व नवनीत यांच्यामध्ये मजाक मस्ती झाली. त्यात लवणीतने प्रथम एका संशयिताच्या डोक्यात मारले. त्यानंतर संशयिताने त्याच्या पोटात दोन बुक्के घालून खाली पाडत गुप्त भागावर कोपरा मारला. झालेल्या हाणामारीत लवनीत बेशुद्ध झाला असता त्यास उपचारासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे दाखल केले. तेव्हा डाॅक्टरांनी तपासून मृत घाेषित केले. देवळाली कँम्प पाेलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *