कामटवाडे येथील एका रहिवाशी इमारतमध्ये आग
सिडको विशेष प्रतिनिधी:-सिडको परिसरातील कामटवाडे भागात माजी नगरसेवक अनिल मटाले यांच्या कार्यालयात लगत असलेल्या एका रहिवाशी इमारत मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बॅग कारखान्याला काल रात्री आग लागली सुदैवाने कुठलीही जिवितहानी झाली नाही परंतु या उद्योगास या रहिवासी इमारती मध्ये सुरू करण्यासाठी परवानगी कुणी दिली याची चौकशी करून संबंधितांवर तसेच व्यवसायीकासह रहिवासी इमारतीत व्यवसाय करण्यासाठी परवानगी देणा-याची चौकशी करुन त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी.अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे