नाशिक: चार वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत राष्ट्रवादी शरद पवार गटात सहभागी झालेले एकनाथ खडसे हे भाजपात स्वगृही परतणार आहेत, लोकसभेची उमेदवारी त्यांची सून रक्षा खडसे यांना जाहीर झाल्यापासून त्यांनी राष्ट्रवादी च्या प्रचारातून अंग काढून घेतले होते. दिल्लीत त्यांची अलीकडेच अमित शहा यांच्याबरोबर मीटिंग पण झाली होती, अखेर त्यांनी आज स्वतःच याबाबत खुलासा करत आपण भाजपमध्ये परतत असल्याचे सांगितले, जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला, आता खडसे पून भाजपात प्रवेश करणार असल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढणार आहे,