नाशिक पुन्हा हादरले; रोकडोबावाडीत युवकाचा निर्घृण खून
नाशिकरोड : प्रतिनिधी
उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील रोकडोबा वाडीत परिसरातमंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ हल्लेखोरांनी युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली.अरमान मुन्नवर शेख (वय १८ रा. सुंदर नगर) असे हल्ल्यात मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी कीं, मंगळवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास अरमान याच्यावर पूर्ववैमनस्यातून वार करूत त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्येची माहिती पसरताच मोठ्या नागरिकांची गर्दी जमा झाली. सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.दरम्यान नाशिकरोड परिसरात वारंवार होणाऱ्या खुनाच्या घटनांनी उपनगर आणि नाशिकरोड परिसर चर्चेत आहे. पोलिसांचा धाक राहिला नाही का असा सवाल केला जातो आहे. मृत अरमानच्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.