नाशकात चाललंय तरी काय? अल्पवयीन मुलाची मित्रांनीच केली हत्या
नाशिक: प्रतिनिधी
शहरात गुन्हेगारी ने कळस गाठला आहे, रस्त्यावरील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नाही, वाहनांची तोडफोड हे आता नित्याचे झाले असतानाच खून करण्याचे प्रकारही आता वाढीस लागले आहेत. वाढत्या गुन्हेगारी ला अटकाव करण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेपुढं निर्माण झाले आहे, केक भरवण्याच्या क्षुल्लक कारणातून मित्रांनीच एका अल्पवयीन मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना पंचवटीत घडली आहे।पंचवटीतील पेठरोड कर्नल नगर येथील रहिवासी असणाऱ्या आशिष रणमाळेची गुरुवारी रात्री हत्या करण्यात आली. आशिष रणमाळे हा 17 वर्षांचा होता. आशिषच्याच जवळच्या मित्रांनी त्याची हत्या केल्याचे म्हटले जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच मित्राच्या वाढदिवशी एकमेकांना केक भरवण्याच्या किरकोळ कारणावरून आशिषचे भांडण झाले होते. हाच राग मनात ठेवून तीन अल्पवयीन मित्रांनी धारदार हत्याराने आशिषची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची अधिक तपास केला जात आहे.