नाशिक : प्रतिनिधी
देशात स्थापन होणाऱ्या एनडीए सरकारचा शपथविधी आज होत असून जे मंत्री शपथ घेणार आहेत त्यांना पीएम ओ कार्यालयातून फोन केले जात आहे. रावेर मधून हट्रिक केलेल्या रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे त्यांना शपथविधी साठी फोन आला आहे, त्यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला मंत्रिपद मिळणार आहे. मागील वेळेस पहिल्यांदाच खासदार झालेल्या भारती पवार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती मात्र यावेळी त्यांचा पराभव झाला, रक्षा खडसे ,स्मिता वाघ या दोन जागा भाजपने राखल्या, पुण्यातून पहिल्यांदाच खासदार झालेलं मुरलीधरमोहोळ यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.
यांना आला फोन
जीतन राम मांझी, हिंदुस्थान आवाम मोर्चा २) जयंत चौधरी, राष्ट्रीय लोकदल ३) अनुप्रिया पटेल, अपना दल ४) डी आर चंद्रशेखर, तेलगू देसम पार्टी ५) के. राम मोहन नायडू, तेलगू देसम पार्टी ६) नितीन गडकरी, भाजप ७) राजनाथ सिंह, भाजप ८) अमित शाह, भाजप ९) अर्जुनराम मेघावाल, भाजप १०) पियुष गोयल, भाजप, ११) मनसुख मांडविय, भाजप १२) ज्योतिरादित्य शिंदे, भाजप १३) रक्षा खडसे, भाजप १४) रामदास आठवले (रिपाइं (ए)) १५) रामनाथ ठाकुर, जनता दल युनायटेड १६) एच.डी.कुमारस्वामी, जनता दल सेक्युलर, १७) सुदेश महतो, ऑल झारखंड स्टुडंट्स युनिअन १८) चिराग पासवान, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) १९) प्रतापराव जाधव, शिवसेना (शिंदे गट)