सिडको: प्रतिनिधी
सिडकोतील त्रिमुर्ती चौकात स्कुल बसच्या धडकेत दुचाकीवरून जाणारा महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला याबाबत अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे
याबाबत थोडक्यात माहिती अशी की राणाप्रताप चौकातील आर्यवत मध्ये रहाणारा मयुर दत्ता गुंजाळ(वय १८)हा आपल्या इलेक्ट्रिकल दुचाकीवरून त्रिमुर्ती चौकाकडुन सीटीसेंटर मॉलकडे जात असतांना गोलीवडा जवळ मयुर दत्ता गुंजाळ हा जागीच ठार झाला,
याघटनेमुळे त्रिमुर्ती चौकात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती दरम्यान, गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी याच ठिकाणी वाळूच्या ढंपरखाली तीन जण जागीच ठार झाले होते त्यानंतर पुन्हा एकदा त्याच ठिकाणी हा अपघात झाल्याची चर्चा सुरु होती.