मनमाडनजीक पुणे दोंडाईचा बस उलटून पाच ते सहाजण जखमी

मनमाडनजीक पुणे दोंडाईचा बस उलटून पाच ते सहाजण जखमी…

मनमाड : आमिन शेख

पुण्यावरून दोंडाईचाकडे जाणाऱ्या बस मनमाड नजीक असलेल्या दहेगाव कुंदलगाव शिवरात उलटुन अपघातग्रस्त झाली या अपघातात जवळपास पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली असुन जखमींना मनमाड उपिजल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचतकार्य सुरू केले.
याबाबत सविस्तर वृत्त असेकी इंदुर पुणे महामार्गावर मनमाड नजीक असलेल्या दहेगाव कुंदलगाव शिवारात पुणे दोंडाईचा ही बस उलटून अपघात झाला या अपघातात
चैतन्य मनोज शर्मा नंदुरबार ,शिवाजी गोरख पाटील अमळनेर , शोभा रमेश भोई मीना मदनलाल पुराबिया अहमदनगर मिनाबाई शिवाजी पाटील अमळनेर यासह पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले असुन त्यांच्यावर मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकानी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले मनमाड एसटी आगारतुन देखील कर्मचारी घटनास्थळी बचतकार्य करण्यासाठी हजर झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *