शिवसेना पक्ष निरीक्षकपदी धनराज महाले

शिवसेना पक्ष निरीक्षकपदी धनराज महाले

दिंडोरी :  प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूकांच्या दृष्टीने निवडणूक प्रभारी आणि दिंडोरी – पेठ विधानसभा शिवसेना पक्ष निरीक्षकपदी माजी आमदार धनराज महाले यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
हिंदुह्दयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ंयांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सदस्य नोंदणी अभियान, मतदार नोंदणी अभियान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी योजना, तसेच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबविल्या जाणार्‍या सर्व शासकीय योजनांबाबत अंमलबजावणीबाबत, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना आदी योजनांच्या माहिती गोरगरीब जनतेंपर्यंत पोहचविण्यासाठी व त्यांना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील, असे आश्‍वासन नवनियुक्त पक्ष निरीक्षक माजी आमदार धनराज महाले यांनी दिले. त्यांच्या निवडीबद्दल शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सुरेश डोखळे, संपतराव घडवजे, मंगला भास्कर, अमोल कदम, सुरेश देशमुख, बाळासाहेब मुरकूटे, बाळासाहेब धुमणे, बाळासाहेब दिवटे, शाम बोडके, संतोष कहाणे, योगेश दवंगे, गणेश दवंगे, सुरज राऊत, सागर गायकवाड, रवि सोनवणे, सागर पगारे, नंदु बोंबले, बाबु मनियार, माणिकराव भुसारे, पद्माकर कामडी, गोपाल देशमुख, पप्पु राऊत, नरेंद्र जाधव, सुजित मुरकूटे, योगेश तिडके, शाम मुरकूटे, प्रमोद देशमुख, मनोज ढिकले, नंदु गटकळ, हिरामण भोये, मनोहर चौधरी, धर्मराज चौधरी, कैलास चौधरी, प्रदीप घोरपडे, पप्पु मोरे, हेमंत पगारे, माणिकराव दवंगे, दशरथ ठेपणे, सुरज गोजरे, शेखर देशमुख, दत्तू लोखंडे, प्रभाकर वडजे किरण तिवारी, गुलाब जमधडे, सचिन उगले, संजय ढगे, सचिन कापसे, जालिंदर गायकवाड, गोविंद बोडके, अरुण बोरस्ते आदींसह महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

One thought on “शिवसेना पक्ष निरीक्षकपदी धनराज महाले

  1. मा.श्री.धनराज हरिभाऊ महाले. ( भाऊ ) तुमचे सर्व प्रथम अभिनंदन ” शिवसेना पक्ष निरीक्षक पदी दिंडोरी – पेठ विधानसभा ” प्रथम गणरायाला वंदन, कुलदेवतेला वंदन करून,हात जोडून चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की तुम्हाला महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळणारच यात तिळमात्र शंका नाही, कारण,माझी देवावर खूप श्रद्धा आहे आणि ती राहणारच. ” मा.हिंदु हृदय सम्राट स्व.मा.बाळासाहेब ठाकरे साहेब, स्व.मा.आनंद दिघे साहेब आणि मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब ( शिवसेना मुख्य नेते ) यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेच राहो, आणि भाऊ तुम्हाला आदिवासी समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मिळो,हि पुन्हा एकदा तेहतीस कोटी देवांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना💐🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *