भर पावसात सिटूचे धरणे आंदोलन

भर पावसात सिटूचे धरणे आंदोलन

सतरा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण..!
मनमाड : प्रतिनिधी

वारसा हक्क लागू व्हावा वारसा हक्काचे प्रलंबित प्रकरण मार्गी लावावे पदोन्नती द्यावी यासह नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सिटु संघटनेच्या वतीने आज मनमाड नगर पालिकेच्या कार्यलायावर धरणे आंदोलन करण्यात आले. सिटु संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ रामदास पगारे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले आझाद हॉल मधील सिटु कार्यालयाच्या ऑफीस मधून मोर्चा काढत पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी सिटु संघटनेचे सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून मनमाड नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सफाई कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या वारस हक्काचा प्रश्न प्रलंबित असून याशिवाय अनेक जणांचे पदोन्नती देखील प्रलंबित आहे यासह विविध मागण्यांसाठी सीटू संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले आझाद हॉल येथील कार्यालयातून मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा पालिकेच्या प्रवेशद्वारावर नेऊन तेथे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी पालिकेच्या विरोधात तसेच आडमुठे धोरण अवलंबणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मनमाड नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या 87 कर्मचाऱ्यांचा प्रश्न येत्या 17 दिवसात मार्गे लागला नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल यास सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार असेल असा इशारा आंदोलनकर त्यांच्या वतीने देण्यात आला आंदोलन सुरू झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली भर पावसात आंदोलनकर त्यांनी आपल्या आंदोलन सुरूच ठेवले आपल्या विविध मागणीची निवेदन पालिका प्रशासनाला देण्यात आले.यावेळी कॉ.अमोल बागुल,किशोर खलसे,रोहित शिंदे,करण चावरिय,प्रकाश खलसे,शुभम चिंडालिया,संगीता निकाळे,गंगादादा त्रिभुवन यांच्यासह इतर पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————————-
येत्या 26 ऑगस्टला आमरण उपोषण करणार…!
सीटूच्या वतीने प्रलंबित मागण्या करीता ९ ऑगस्ट क्रांतिदिनी एक दिवसीय गेट निदर्शने धरणे आंदोलन करण्यात आले आहे जर मागण्या मान्य नाही केल्या तर येत्या २६ ऑगस्ट २०२४ रोजी प्रलंबित मागण्यांसाठी ३५ कामगार आमरण उपोषण करणार आहेत तसेचे जे अधिकारी काम करण्यासाठी टाळाटाळ करत असतील त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्याची आमची मागणी आहे. मनमाड नगर परिषदेतील सीटू संलग्न महाराष्ट्र नगर परिषद कामगार कर्मचारी संघटनेचे पदधिकारी हेही यात सहभागी होतील व होणाऱ्या परिणामास पालिका प्रशासन जबाबदार असेल

रामदास पगारे,जनरल सेक्रेटरी सिटु संघटना

मयत कामगारांच्या वारसदार यांच्या वाढत्या वयाचा विचार करावा तसेच कुटुंबावर उपासमारीची वेळ येत असून त्यांना मा.जिल्हाधिकारी सो यांच्या सेवाज्येष्ठते यादी नुसार अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर घेण्यात यावे .अश्वसित प्रगती योजना.१ ली व दुसरी कालबद्ध पदोन्नती. वशिला पध्दतीने सेवाज्येष्ठता यादी डावलून काहीना लाभ देण्यात आला परंतु अद्याप बऱ्याच कामगारांना पहिली व दुसरी कालबद्ध पदोन्नती चा लाभ देण्यात आला नाही तसेच सफाई कामगारांना ही लागु करुन आर्थिक लाभ देण्यात यावा. तसेच इतर विभागातील वर्ग ३ वर्ग ४ च्या कर्मचारी यांना अद्याप पावेतो लागु करण्यात आला नाही. त्यांना त्वरित विनामूल्य लागु करण्यात यावा .
औरंगाबाद हायकोर्टाने नुकताच दिनांक २४/६/२०२४ रोजी दिलेल्या लाड पागे समितीच्या निकाला प्रमाणे तसेच मा.आयुक्त तथा संचालक नगर पालिका प्रशासन संचालनालय बेलापूर मुंबई यांच्या न.प.प्र.सा.२०२४/लापास/प्र.क्र.५७/कक्ष-४ दिनांक ३०/७/२०२४ जा.क्र ४४०१ परिपत्रका प्रमाणे लाड पागे समितीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत च्या आदेशा नुसार वारसाहक्क प्रकरणे विनामूल्य मार्गी लावण्यात यावेत.
मनमाड नगर परिषद प्रशासन कामगार हिताचे निर्णय न घेणे संबधित विभागाच्या मनमानी कारभाराला आळा बसेल अशी कारवाई व्हावी व S.C./S.T.मागासवर्गीय सेवाज्येष्ठता यादी जाहीर करण्यात यावी.व त्या प्रमाणे बढती पदोन्नती (प्रमोशन ) देण्यात यावी.
मनमाड न.प.अस्थापना विभाग हे कामगार हीताच्या निर्णयाची माहीती महाराष्ट्र शासनाला.मा.संचालक कार्यालय जिल्हा प्रशासनाला खरी व परिपूर्ण देत नाही.उदा मागासवर्गीय रिक्त जागा/रिक्त जागा.कामगारांच्या तारखेचा घोळ इत्यादीं विषयाबाबत आस्थापना विभागातील काही महाभाग चुकीची कामे करित असतात त्यांची तेथून बदली करण्यात यावी व त्यांच्या जागेवर केडर च्या अस्थापना विभाग प्रमुख म्हणून कायम स्वरुपी नेमणूक करण्यात यावी.
मनमाड नगर परिषद ही नाशिक जिल्ह्यातील ची मोठी नगर परिषद असून त्या नगरपरिषदेत गेल्या २ ते ३ वर्षांपासून पुर्ण वेळ (प्रमुख) म्हणून मुख्य आरोग्य निरीक्षक.अस्थापना निरिक्षक.पाणी पुरवठा इंजिनिअर.लेखापाल.कर अधिक्षक. इलेक्ट्रिक इंजिनिअर. इत्यादी पदावर कामाच्या सोईनुसार फुकट फौजदार कामगार करीत असुन त्या विभागाला पुर्ण वेळ संवर्ग च्या सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *