शॉक लागून युवकाचा मृत्यू
सातपूर : प्रतिनिधी
विद्यूत वायरीचा शॉक लागून एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत श्रमिक नगर सातमाऊली चौक परिसरात आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. मंगेश राणेअसे मृतक युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार मयत मंगेश याच्या घराचे बांधकाम चालु होते नेहमीप्रमाणे बांधकामाला पाणी मारण्यासाठी गेला होता. मात्र ती वायर हाय होल्टेज आसल्याने शाॅक लागून मंगेशचा मृत्यू झाला कुटुंबियांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलीस व महावितरण विभागाचे अधिकारी दाखल झाले होते