मुंबई: बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. बदलापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेऊन पोलीस ठाण्याकडे जात होते. यादरम्यान आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांकडे असलेली बंदूक घेऊन गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी इतर पोलिसांनी त्याच्यावर स्वसंरक्षणार्थ अक्षय याच्यावर गोळ्या झाडल्या, यात अक्षय गंभीर जखमी झाला होता त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला. तळोजा कारागृहात त्याला घेऊन बदलापूर ला नेण्यात येत होते.