ओबीसी मतदान विभागल्यास कोणत्याही
पक्षाला बहुमत मिळणार नाही ; प्रकाश आंबेडकर
मनमाड : आमिन शेख
ओबीसी संघटना आणि ओबीसी मतदार तसेच वंचीत बहुजन आघाडी एका बाजूने गेले तर एका पक्षाचे सरकार येईल मात्र ओबीसी मतदान वाटल्या गेले तर मात्र कोणत्याही पक्षाला बहुमत (फॅक्चर मॅडेड) मिळणार नाही जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आम्ही विरोध करतो मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळू नये या ओबीसींच्या मागणीला आमचाही पाठिंबा आहे वंचित बहुजन आघाडी ओबीसींचे नेतृत्व करत असुन त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा असो की होणारे हल्ले या सर्व ठिकाणी वंचित बहुजन आघाडी फ्रंटला आहे यामुळे ओबीसींनी वंचितच्या मागे उभे राहिले पाहिजे ओबीसी वंचितसोबत आले तर विधानसभा निवडणुकीत 3 अंकी संख्या असलेले आमदार वंचित बहुजन आघाडीचे निवडून येतील असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मनमाड येथे व्यक्त केले आदिवासी सत्ता संपादन परिषदच्या निमित्ताने ते मनमाडला आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलते होते.
देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे व अमित शहा संजय राऊत यांच्या गुप्त बैठकीबाबत बोलताना ते म्हणाले की डिडेकटीव्ह लॉजिक प्रमाणे जेव्हा असेच घडेल असे आम्हाला वाटत तेच आम्ही जनतेसमोर मांडतो भविष्यवाणी करत नाही अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे सर्व माहिती असते त्यांना विचार सिद्धार्थ मोकळेने जे आरोप केले ते खरे की खोटे आर एस एस प्रणित साधूंनी मागे साईबाबांच्या दर्शनासाठी जाऊ नका असा फतवा काढला होता मात्र हा साईबाबांच्या भक्ताचा आपमान करण्याचा प्रयत्न आहे याशिवाय साईबाबांना मानू नये यातूनच या घटना घडत आहे मुळात साईबाबांच्या भक्तांनी बिजेपीला धडा शिकवावा आर एस एस बीजेपी व यांच्या प्रणित संघटनां कॉपी मास्टर संघटना आहेत यांच्याकडे जिहाद ला हिंदी मराठी शब्द नाही यामुळे त्यांनी मुस्लिमांचा जिहाद शब्द कॉपी करून हिंदू धर्मात समावेश हिंदू जिहाद असे करण्याचे काम करत आहे.कोणत्याही पक्षाचे आपले अजेंडा असतात ते कार्यक्रम घेऊन जनतेसमोर जातात मात्र जनता ठरवते काय राहील किंवा काय नाही यामुळे या गोष्टीला जास्त महत्व देऊ नये असे मला वाटते असे आंबेडकर म्हणाले.आदिवासी समूह ओबीसीं समूह यांना एकत्रित करून तिसरी आघाडी स्थापन करू नागपूरला या तिसऱ्या आघाडीच्या नावाची अधिकृत घोषणा करू असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले यावेळीं या आघाडीत बच्चू कडु वैगेरे कोण कोण असणार असे विचारताच अजिबात नाही यात डागळलेले चोरलेले लुटलेले आशा कोणालाही आम्ही सोबत घेणार नाही असे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आंबेडकर मनमाडला आले असतांना त्यांनी आदिवासी वाड्या वस्त्यांवर जाऊन आदिवासींच्या समस्या समजुन घेत जन जमीन जंगलचे खरे हक्कदार आदिवासी बांधव आहेत त्यांना आजही शासकीय योजनापासुन वंचीत रहावे लागते आहे यामुळे महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवांना एकत्रित आणुन त्यांना सत्तेत बसवण्याचे काम आम्ही करणार आहोत असे सांगितले यावेळी त्यांनी आदिवासी बांधवासोबत जेवण देखील केले.लहान मुलांसोबत तसेच आदिवासी महिलांसोबत फोटो काढुन त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न आंबेडकर यांनी केला.यावेळी शहराध्यक्ष आम्रपाली निकम, भटके विमुक्त जमातीचे प्रमुख अरुण जाधव आदिवासी संघटना प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव नाशिकचे पवन पवार चेतन गांगुर्डे यांच्यासह इतर राज्य कार्यकारणी सदस्य व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.