नाशिक : प्रतिनिधी
मुलींच्या जाचाला कंटाळून 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची
घटना सिडकोच्या कामटवाडे परिसरात घडली मृत पावलेल्या युवकाचे नाव ललित बाळासाहेब कोयटे असून तो बळी मंदिराजवळ कॅफेचा व्यवसाय करीत होता..आत्महत्या करताना याने चिठ्ठी देखील लिहिली असून, या चिठ्ठी मध्ये दोन मैत्रिणी व एका मित्राचे पैसे मागण्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे..याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.दोन मैत्रिणी एक मित्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ..