इगतपुरी चे आमदार खोसकर यांनी सोडला काँग्रेसचा हात, अजीत पवार गटात प्रवेश
नाशिक: प्रतिनिधी
विधान परिषद निवडणुकीत मत फुटीमुळं संशयाच्या भोवऱ्यात अडकलेलं काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यांच्यावर कॉंग्रेस ची मंडळी नाराज होती, कारवाई ची टांगती तलवार आणि कॉंग्रेस कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर वाटू लागल्यानं त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला, आज अजितदादा पवार, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे