आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
सातपूर: प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या असता, नाशिक शहर आयुक्तालयात रूजू झालेले पोलीस निरीक्षक शिवाजी माणिक पासलकर यांची नेमणूक सातपूर पोलीस ठाण्यात केली आहे. तर सहायक पोलीस निरीक्षक हर्षल देविदास अहिरराव यांची नेमणूक गंगापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नाशिक शहर पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव गोरखनाथ काळे यांची सरकारवाडा पोलीस ठाण्यातून आडगाव पोलीस ठाण्यात, उपनिरीक्षक रोहित कैलास गांगुर्डे यांची सातपूर येथून विशेष शाखेत, उपनिरीक्षक अतुल बाबूराव पाटील यांची एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी येथून अभियोग कक्षात बदली करण्यात आली आहे.
उपनिरीक्षक वसंत निवृत्ती लांडे यांची गंगापूर येथून नियंत्रण कक्षात बदली केली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सदरील बदल्यांचे आदेश जारी करीत तत्काळ रूजू होण्याचे आदेश दिले आहेत.