फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या युवतीची इंदिरानगर येथे आत्महत्या
इंदिरानगर : प्रतिनिधी
इंदिरानगरमधील साईनाथ नगर चौफुली जवळ एका बावीस वर्षीय युवतीने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनम गुलमोहम्मद खाटीक या युवतीने साईनाथ नगर येथील प्रतिभा संकुल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी घेत आत्महत्या केली. ती जे एम सी टी फार्मसी कॉलेज मध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होती. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.