नाशिक: प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीतून ठाकरे गटात अडव्यय हिरे यांनी प्रवेश केल्यानंतर अजित पवार गटात थांबलेले अपूर्व हिरे यांनीही आज राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यापूर्वी त्यांचे वडील प्रशांत दादा हिरे हे शिवसेनेत होते. आता प्रशांत हिरे यांच्या दुसऱ्या पिढीने शिवसेनेत प्रवेश केला आहे. अपूर्व हिरे यापूर्वी भाजप, नंतर अजित पवार गट आणि आता शिवसेनेत दाखल झाले आहेत नाशिक पश्चिम मतदार संघातून त्यांनी अजित पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती, मात्र हा मतदार संघ भाजपच्या वाट्याला गेला असून येथून सीमा हिरे यांना उमेदवारी देखील जाहीर झाल्याने अपूर्व हिरे यांनी थेट ठाकरेंची भेट घेत शिवबंधन बांधल्याने आता राजकीय घडामोडी ना वेग आला आहे.