दिंडोरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी लाच घेताना जाळ्यात

दिंडोरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी लाच घेताना जाळ्यात
नाशिक: प्रतिनिधी
वीस हजार रुपयांची लाच घेताना दिंडोरीचे तालुका वैधकीय अधिकारी सुभाष हरिभाऊ मांडगे रा.श्री शक्ती अपार्टमेंट फ्लॅट नंबर2, कलानगर, म्हसरूळ यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
तक्रारदार कोशिंबे येथे वैधकीय अधिकारी या पदावर असून कोशिंबे आरोग्य केंद्रात सन2020-21,2023-24 या कालावधीत शासनाने2,27,000 असा निधी विविध कामासाठी वापरण्यात आला. या खर्चाबाबतचे लेख परीक्षण झाले आहे, असे असताना मांडगे यांनी। 10 टक्क्यांनी 20 हजार रुपये कमिशन मागितले, तक्रारदार यांनी या संदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती,, पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद चौधरी, पोलीस शिपाई अनिल गांगोडे, परशुराम जाधव यांनी सापळा रचला, त्यात संशयित वैधकीय अधिकारी हे लाच स्वीकारताना रंगेहाथ अडकले, अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *