पारा ५.७ अंशांवर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर!

पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर!
निफाड :  प्रतिनिधी
शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे मंगळवार दि १७ रोजी पारा ५.७ अंशावर आला असल्याची नोंद कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रावर करण्यात आली आहे
निफाड तालुक्यात पारा घसरण स्थिरावली आहे त्यामुळे थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे सकाळी शाळा महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थी वर्गाचे तसेच दुधवाले पेपरवाले यांचे या थंड हवामानात चांगलेच हाल होत आहे पारा घसरण सुरुच राहिल्याने सर्वत्र शेकोटीचा आधार घेतला जात आहे
पारा स्थिरावला आहे मात्र द्राक्ष बागाईतदार अस्थिर झाला आहे पहाटेच्या थंड हवामानात द्राक्ष मण्यांना तडे जाऊ नये म्हणुन पाणी देणे शेकोटी करणे ह्या उपाययोजना कराव्या लागत असल्याने द्राक्ष बागाईतदार व मजुरांची पहाटेपासुन थंडीशी झुंज सुरु आहे.

@ पारा घसरण होत असल्याने द्राक्षबागांच्या मुळ्या व अंतर्गत पेशी यांची कार्यक्षमता रोडावते त्यामुळे जमीनीतुन अन्नपुरवठा द्राक्षवेली उचलु शकत नाही. त्यामुळे द्राक्षमालाची फुगवण थांबते तसेच परिपक्व झालेल्या द्राक्षमण्यांना या थंडीने बारिक तडे जाण्याचा धोका वाढतो त्यासाठी पाणी देणे ,शेकोटी पेटविणे अशा उपाययोजना कराव्या लागतात
बाबूराव सानप
द्राक्ष बागाईतदार सोनेवाडी खुर्द ता निफाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *