मनमाड रेल्वे स्थानक हरवले…?
मनमाड(आमिन शेख):- मनमाड रेल्वे स्थानक हरवले वाचून आश्चर्य वाटले हो तशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली असुन मनमाड शहरासह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुक्याची चादर पसरली असुन यामुळे मनमाड रेल्वे स्थानक यासह गुरुद्वारा तसेच संपूर्ण शहरच हरवले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या दाट धुक्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार असुन यामुळे रेल्वेच्या वेळेत देखील बिघाड झाला आहे उत्तर भारतातुन येणाऱ्या रेल्वे गाड्या या उशिराने धावत आहे यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे याशिवाय मनमाड शहरात नागरिकांना जम्मु काश्मीर सारख सुख अनुभवयास मिळत आहे.