मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने
सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी
मनमाड : प्रतिनिधी
संपूर्ण राज्यात नायलॉन मांजा तसेच चायनीज माझ्यावर बंदी असताना देखील अनेक ठिकाणी तो सर्रासपणे विकला जात आहे मनमाड शहरात देखील अनेक ठिकाणी गुप्त पद्धतीने नायलॉन मांजा विक्री सुरू असून या मांज्यामुळे गॅस सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी झाला आहे त्याच्या मानेला व हाताच्या दोन्ही बोटांना गंभीर दुखापत झाली आहे त्याला तात्काळ येथील खाजगी रुग्णालयात त दाखल करून उपचार करण्यात आले आहे नायलॉन मांजा विक्री बाबत मनमाड शहरात प्रशासनाने कोणत्याही प्रकारची गंभीर दखल न घेतल्यामुळे ही घटना घडल्याचे नागरिकांनी म्हटले आहे
संपूर्ण राज्यात नायलॉन मांजा तसेच चायनाच्या मांज्यावर बंदी आणण्यात आली आहे याची विक्री करणाऱ्या वर शासनातर्फे कठोर कारवाई करण्यात येत असली तरी मनमाड शहरात महिलांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू होती आणि याचाच फटका आज आणि मकर संक्रांतीच्या दिवशी बसला असून गॅस सिलेंडर वाटप करणारे काकासाहेब भालेराव हे गोडाऊन वर आपली गाडी लावून मोटरसायकलवर घरी परतत असताना शिवाजीनगर येथील दत्त मंदिर पुलावर त्यांच्या मानेला व हाताच्या दोन्ही बोटांना नायलॉन मांज्याने कापले जाते गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मुळात नायलॉन मांजा व चायनीज मांजा यांच्यावर बंदी असताना देखील तो मनमाड शहरात सर्रासपणे विकला जात असताना याबाबत कोणीच कशी दखल घेतली नाही हा मोठा प्रश्न मनमाडकर यांचे समोर उभा राहिला असून ज्यांनी कोणी ही माझ्या विक्री केली त्यांच्यावर कारवाई होईल का असा सवाल देखील भालेराव यांच्या कुटुंबीयातर्फे तसेच मनमाड शहरातील जनतेतर्फे विचारण्यात येत आहे