सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार

सापुतारा जवळ बस दरीत कोसळून पाच प्रवाशी ठार

४५ प्रवासी जखमी.

सुरगाणा : प्रतिनिधी

वणी -बोरगाव-सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील माळेगावच्या घाटात रविवारी पहाटे चार ते साडेचार वाजे दरम्यान महाराष्ट्र मधून गुजरात राज्यात जाणारी खासगी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने (युपी ९२ एटी ०३६४) बस उलटली, यात पाच प्रवासी मृत्यूमुखी झाले असून ४५ प्रवासी जखमी झाले आहेत.
सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे मध्य प्रदेश येथून चार धाम यात्रा करण्यासाठी निघालेली बस गुजरात राज्यातील माळेगावच्या घाटात पलटी झाल्याने यामध्ये रतनलाल देविराम जातव(४१), बोलाराम पोसाराम कुसवा (५५), गुहीबेन राजेशभाई यादव (६०), बिजेंद्र बादल यादव (५५), कमलेश भाई यादव (६०, सर्व राहणार मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे. बसमधील जखमी २१ प्रवासी यांना शामगव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गंभीर जखमी २४ यांना अहावा येथे दाखल करण्यात आले आहे.

पाहा व्हिडीओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *