नाशिक खुनाच्या घटनेने हादरले, कुकरचे झाकण, कोयत्याने मारल्याने पत्नीचा मृत्यू

सिडको: विशेष प्रतिनिधी

घरातील आपआपसांतील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी (दि.४) राहत्या घरात बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरच्या झाकणाने वार करून खुन केला. गंगापुररोडवरील डी.के नगरातील स्वास्तिक निवास सोसायटीमध्ये ही घटना आज  घडली.
सविता  गोरे (४५) असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर पती घरातून पळून गेला होता मात्र पोलिसांनी रात्री त्यास पकडले.

गंगापुररोडवरील डी.के.नगर भागात असलेल्या स्वास्तिक निवास (बी-विंग) सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरील गोरे दाम्पत्य हे मुलासह भाडेतत्वावर सदनिकेत राहत होते. मंगळवारी मुलगा हा सकाळी कामावर निघून गेल्यानंतर सविता-छत्रगुन हे पती-पत्नी घरात एकटेच होते. दुपारी पती-पत्नीमध्ये भांडण झाले. यावेळी शत्रूघन गोरे (५०) याने रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात कोयता व कुकरचे झाकणाने जोरदार प्रहार केला. यामुळे सविता गोरे या रक्तबंबाळ अवस्थेत लाकडी पलंगावर कोसळल्या. यावेळी त्यांची विवाहित मुलगी फिर्यादी मुक्ता बालाजी लिखे ही त्याचवेळी घरी आल्यानंतर दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा वाजविल्यानंतर तिचे वडील शत्रूघनयांनी दरवाजा उघडला असता आई रक्तबंबाळ अवस्थेत बेडरूममध्ये पडलेली आढळून आली. तेथून तोपर्यंत शत्रूघन हा फरार झाला होता. मुक्ता हिने शेजाऱ्यांचे दार वाजवून मदत मागितली यावेळी रहिवाशांनी धाव घेतली.  या प्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फरार पतीस अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *