सातपूर: प्रतिनिधी
श्रमिकनगर येथील कडे पठार चौक, परिसरात वाहने फोडण्याचा प्रकार उघडकीस आला असून टवाळखोरांनी उन्माद करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई करावी, माजी सभागृह नेते दिनकर पाटील तसेच, भयभीत नागरिकांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातपूर परिसरातील टवाळखोरांचा उन्माद वाढला असून महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये श्रमिकनगरमधील रहिवासी अरूण कोळी,सोमनाथ नागरे, आदींसह नागरिकांच्या वाहनांची काही समाजकंटकांकडून तोडफोड झाली.
घटनास्थळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील, समवेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली.