नाशकात भरदिवसा युवतीवर चाकूने वार

नाशकात भरदिवसा युवतीवर चाकूने वार

सिडको : विशेष प्रतिनिधी

त्रंबकरोडवरील जिल्हा रुग्णालया समोरील अनंत कान्हेरे मैदानावर सोमवारी सकाळी १०वाजेच्या सुमारास एका १९ वर्षीय युवतीवर प्रेम प्रकरणातून हल्ला झाल्याची घटना मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे असून यातील संशयीत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याप्रकरणी थोडक्यात माहिती अशी की पीडित १९ वर्षीय पिडीत मुलीचे तिच्याच नातेसंबंधातील मुला सोबत गेल्या काही वर्षापासून प्रेम संबंध होते आणि दोघांचे विवाह करण्याचेही त्यांचे ठरले होते मात्र त्यादरम्यानच पीडित तरुणी अन्य मित्रासोबत गोल क्लब मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता त्याला भेटण्यासाठी आली त्याचवेळी तिचा आते भाऊ केदार गणेश जंगम ही त्या ठिकाणी आला त्याने संबंधित पिढीतील आपले लग्न करायचे ठरले आहे तरी ही तू दुसऱ्यासोबत का फिरत आहे असा जाब विचारला मात्र त्या मुलीने तिच्या आते भाऊ केदार गणेश जंगम याला उडवा-उडवीचे उत्तरे दिले त्याच रागाच्या भरात गणेश जवळ असलेल्या धारदार शास्त्राने गणेशने मुलीवर हल्ला करण्यात सुरुवात केली संबंधित मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले मात्र काही जागृत नागरिकांनी गणेशला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले मुंबई नाका पोलिसांनी चौकशी केली असता गणेशने आमचे गेल्या काही वर्षांपासून प्रेम संबंध होते आम्ही लग्न करणार होतो मात्र तिने लग्नास नाकार दिल्यामुळे मी रागाच्या भरात कृत्य केल्याची कबुली दिली याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित गणेश विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *