पांडवलेणी डोंगरावर भर दुपारी आग

सिडको : दिलीपराज सोनार

-पांडवलेणे डोंगरावर दुपारी २ वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे ही आग नक्की लागली की लावली गेली याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे दरम्यान आग विझवण्यासाठी वनविभागााचे कर्मचारी १० ते १५ कर्मचार्‍यांनी शर्तीने प्रयत्न करत असताना डोंगरावर हवेचा वेग वाढल्याने ही आग विझवण्याऐवजी ती पेटतच होती आगी बाबत इंदिरानगर पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला
दुपारी लागलेल्या आगीची व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पर्यावरण आणि वृक्ष प्रेमींनी पांडवलेणे डोंगराकडे धाव घेतली आणि भविष्यात अशा प्रकारच्या आगी रोखण्यासाठी वनविभागाकडुन प्रतिबंध लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे

पहा व्हिडीओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *