दहा हजारांची लाच घेताना
वनविभागाचे दोघे जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहायक वनसंरक्षक तसेच वनपालाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी काल रंगेहाथ पकडले.
यातील तक्रारदार यांनी शेतातील जांभळाचे व सादडाचे जुने वाळलेले झाडाचे लाकडे पिकअपमध्ये भरून गोंदे येथील पेपर मिल येथे विक्रीसाठी घेऊन जात असताना फ़ॉरेस्ट खात्याचे वनसंरक्षक निरभवने तसेच वनपाल सुरेश चौधरी व कावेरी पाटील यांनी 31 जानेवारी रोजी पकडून मेरी म्हसरूळ या कार्यालयात गाडी जप्त केली होती. सदरची गाडी मालासह सोडण्यासाठी निरभवने यांनी वनपाल सुरेश चौधरी यांच्या मार्फत दोन हजार रुपये दंड व लाच म्हणून दहा हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकहे तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला.
चौधरी यांनी दोन हजार रुपये दंड व दहा हजार रुपये रोख घेऊन निरभवणे यांना फोन करून दहा हजार रुपये माझ्याकडे मिळालेले आहेत. असे कळविले असता निरभवणे यांनी तक्रारदाराला त्याची गाडीची ऑर्डर घ्यायला पाठवून दे असे फोनवर बोलले.
म्हणून दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वाडीवर्हे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उपधीक्षक एकनाथ पाटील, हवालदार सुनील पवार, पोलिस नाईक योगेश साळवे, हवालदार विनोद पवार यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.