पोलिसांचा छापा ,गैरकृत्य करणारे महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
सिडको विशेष प्रतिनिधी
सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कल येथील ‘मोगली सरकार वाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आणि पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकली . यावेळी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी अनैतिक कृत्ये करताना आढळून आले. पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून, महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रवीण बागुल यांच्या पथकाने कॅफे उध्वस्त केला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मोगली कॅफेची चर्चा होती. येथे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आव्हाड आणि चव्हाण यांच्या पथकाने शनीवारी दुपारी या कॅफेवर छापा टाकला. यावेळी अनेक शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी अनैतिक कृत्ये करताना आढळून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी याप्रकरणी कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, हा कॅफे सील करण्यात आला आहे. त्यानंतर बागुल यांच्या नेतृत्वाखालील अतिक्रमण विभागाच्या पथकाने कॅफेची इमारत उध्वस्त केली. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा-कॉलेजच्या परिसरात असे अड्डे वाढत असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत आहे. यावर प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज आहे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. मुले कुठे जातात, काय करतात याची माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच, मुलांना योग्य मार्गदर्शन करणेही गरजेचे आहे.