मनमाडला गायी तस्कर करणाऱ्या गाडीचा व पोलीस गाडीचा अपघात एक पोलीस व तस्कर जखमी….!
मनमाड : आमिन शेख
मनमाड नजीक नागापूर येथे सिद्धिविनायक पेट्रोलियम समोर गायीची तस्करी करणाऱ्या पिकअप व पोलिस गाडीचा अपघात होऊन या अपघातात एक पोलिस व पिकअप चालक जखमी झाला असल्याची घटना घडली असुन पिकअप मधील गायीदेखील जखमीझाल्या आहेत
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असुन मदतकार्य सुरू केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असेंकी मनमाड नांदगाव महामार्गावर नागापूर जवळ असलेल्या इंधन कंपन्या समोर सिद्धिविनायक पेट्रोलियम समोर गायी तस्करी करणाऱ्या पिकअप व पोलीस गाडीचा पाठलाग करत असतानाच अपघात झाला या अपघातात पिकअप गाडी उलटली यामुळे यात असलेल्या 2 बैल आणि 5 गायी जखमी झाल्या तर पिकअप चालक हादेखील जखमी झाला पोलीस गाडीतील हवालदार देखील जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच इंधन कंपन्या मधील चालक वाहक यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले जखमींना तात्काळ मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर क्रेन आणून गाड्या सरळ करून रस्त्याच्या बाजूला उभ्या केल्या व वाहतूक सुरळीत केली.