शिंदवडला द्राक्षबागेत जखमी बिबट्या जेरबंद
वनविभागाचे दोन कर्मचारी जखमी,रुग्णालयात दाखल
दिंडोरी : प्रतिनिधी
:तालुक्यातील शिंदवड येथे द्राक्ष बागेत मुक्त संचार करणारा बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे यावेळी बिबट्या जेरबंद करताना बिबट्याने हल्ला चढवला त्यामुळे दोन कर्मचारी जखमी झाले.
भाऊसाहेब बरकले यांच्या शेतात जनावरांसाठी गवत काढणीसाठी मनोज वाघमारे हा गेला होता त्यांने गवतात बिबट्या बघुन पळाला व सर्वांना सांगितले यावेळी बरकले यांनी इतरांना सांगुन बिबट्या असलेल्या ठिकाणी दुरुन पाहणी करत सदर माहिती ग्रामपंचायत सदस्य अमोल बरकले यांनी वरखेडा बिटचे ज्ञानेश्वर वाघ यांना दिली वाघ यांनी वरिष्ठांना कळवले व सर्व टिम घेऊन वाघ हे शिंदवड येथे पोहचले यावेळी बिबट्या जखमी असुन देखील हळुहळु चालुन बिबट्या शरद बरकले यांच्या शेतात पोहचला बिबट्या द्राक्षबागेच्या व कांद्याच्या बांधावर बसला होता.बिबट्या बघण्यासाठी पुढे सरसावलेल्या अधिकाऱ्यांवर अचानक बिबट्याने हल्ला चढवला संरक्षक जाळी पुढे करत बचाव करण्याचा प्रयत्न केला सर्व वनअधिकारी कर्मचारी एकवटले आणि जखमी असलेले शांताराम शिरसाठ व आण्णा टेकनर यांनी बिबट्याला जाळीने पकडुन ठेवला परंतु बिबट्या जखमी असुन देखील आक्रमक होत असल्याने बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करता येत नव्हता.यावेळी नाशिक येथुन डॉक्टरांची टिम पोहचली आणि बिबट्याला बेशुध्द केले त्यांनतर बिबट्या ला पिंजऱ्यात टाकण्यात आले व तात्काळ उपचार सुरु केले जखमी बिबट्याच्या पायाला दुखापत असल्याने त्याला पळता येत नव्हते तसेच उन्हामुळे बिबट्या आजारी पडला असुन त्याला शरद बरकले यांच्या शेतातच सावलीत नेवुन उपचार सुरु केले व सलाईन संपल्यानंतर बिबट्याचा ताप कमी झाल्यावर बिबट्याला वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आले यावेळी डॉ हेमराज सुखवल,समर्थ महाजन,राकेश मोरे,तसेच उमेश वावरे उपवन संरक्षक पुर्व नाशिक,संतोष सोनवणे सहाय्यक वन संरक्षक ,सुशांत पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी,रामचंद्र तुंगार वनपरिमंडळ अधिकारी वणी ,आण्णा टेकनर वनरक्षक,न्यानेश्नर वाघ,हेमराज महाले,जयराम शिरसाठ,शांताराम शिरसाठ,परसराम भोये कर्मचारी,यावेळी वनविभागाने मोठी कामगिरी पार पाडली. शिंदवडच्या तरुणांचे मोठे सहकार्य मिळाले.शिंदवड ग्रामस्थ यांनी वनविभागाचे व रेस्कीव टीम डॉ सखवल यांचे आभार मानले.
सकाळी आम्हांला समजले की शिंदवड येथे जखमी बिबट्या दिसुन आला आहे आम्ही तात्काळ शिंदवड गाठले बिबट्याला वनविभागाने पकडुन ठेवले होते आम्ही बिबट्याला बेशुध्द केले व १०८ वर बिबट्याचा ताप होता पायाला जखमा होत्या आम्ही सलाईन देवुन पुढील वैद्यकीय सेवेसाठी नेण्यात आले.
डॉ .हेमराज सुखवल
शिंदवड येथे जखमी बिबट्या असल्याचे समजले तात्काळ आमची टीम पोहचली.या रेस्कीवमध्ये यावेळी बिबटने प्रतिहल्ला केला यात आमचे दोघे कर्मचारी जखमी झाले उपचार सुरु असुन प्रकृती ठिक आहे.आमची रेस्कीव टीम जखमी बिबटवर देखील उपचार करत आहे.
सुशांत पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी दिंडोरी