विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात 39 हजार मतदारांची वाढ

नाशिक : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या निवडणूका होऊ घातलेल्या असल्याने या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदरीने गती घेतल्यचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणूकानंतरच्या पाच महिन्यांमध्ये तब्बल 39 हजार मतदारांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीमध्ये 16,159 मतदाराला पुरुष असून 23,522 महिलांनी पुढाकार घेतला आहे. यात मोठ्या प्रमाणात शहर परिसरातून नोंदणीचा ओघ असल्याचे दिसून येत आहे.
मतदान जनजागृती अभियानांतर्गत मतदारांची नोंदणी करणे हा महत्त्वाचा भाग निवडणूक प्रशासनाने जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत 20 नोव्हेंबर 2024 रोजी 50 लाख 61 हजार 185 मतदारांची नोंदणी होती. 4 एप्रिल 2025 रोजी हीच संख्या 51 लाख 883 एवढ्या मतदारांची नोंद झालेली आहे. यात 39 हजार 698 मतदारांनी नाव नोंदणी वाढल्याचे दिसून येत आहे
नाशिक पश्चिम मतदार नोंदणीत आघाडी घेतली असून,5 महिन्यांमध्ये 10,622 मतदारांनी नोंदणी केली आहे. त्या पाठोपाठ देवळाली विधानसभा मतदारसंघात 5,764 मतदार नोंदणी झाली आहे.
नाशिक मध्य मध्ये 3,013, निफाड मध्ये 3,268, नांदगाव मध्ये 2,866, मालेगाव बाह्य मध्ये 2,786, येवल्यात 2,208, इगतपुरी 2,112, दिंडोरीत 2,681, सिन्नर मध्ये 1,778, चांदवड मध्ये 1,743, मालेगाव मध्ये 1,519 अशी मतदार नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हातील तृतीय पंथी मतदारांच्या संख्येतही 17 ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *