नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतल्या नंतर अक्षयतृतीयेच्या दिवशी राज्यभरातील मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र उद्या इद असल्याने मुस्लिम बांधवांना आनंदात सण साजरा करू द्या. असे ट्टिवट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. तसेच पुन्हा एकदा भोंगा हा विषय धार्मिक नसून सामाजिक असल्याचे नमूद केले आहे. तसेच त्याबाबत पुढे नेमक काय करायच हे उद्या ट्टिवट द्वारे मांडणार असून राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आदेश देणार याकडे सर्वाच लक्ष असेल. सध्यातरी मनसेने महाआरतीचा निर्णय रद्द केल्याचे स्पष्ट झाले आहे.