लासलगाव बाजार समितीच्या सभापतिपदी या नेत्याची निवड
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाचे पालन
लासलगाव:-समीर पठाण
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाचे पालन करत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डी के नाना जगताप यांची तर उपसभापती पदी ललित दरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.लासलगाव बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक सहकारी संस्था निफाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली
सभापती पदासाठी डी के जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपसभापती पदासाठी ललित दरेकर व राजेंद्र बोरगुडे यांचे अर्ज आले होते मात्र राजेंद्र बोरगुडे यांनी माघार घेतल्यानंतर ललित दरेकर यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी दिलीप खैरे यांच्या सह बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळासह पत्रकार बांधव उपस्थित होते