डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध घटनांचे उपनगरला प्रदर्शन

उपनगर वार्ताहर:
उपनगर-गांधीनगर संयुक्त जयंती समितीतर्फे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आगळ्यावेगळ्या प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्यात आली. समितीतर्फे यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या कोट, शूज, काठी, हॅट आदी वस्तूंचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात घडलेल्या विविध घटनांचे चित्ररूपी प्रदर्शन तीन दिवस उपनगरच्या सुभेदार रामजी सभागृहात पार पडले.
संयुक्त जयंती समिती अध्यक्ष मनिष वडनेरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी प्रदर्शन बघण्यास एकच गर्दी केली होती. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी
मार्गदर्शक प्रशांत दिवे, राहुल दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे मोहन पवार, अनिल जोंधळे, प्रवीण नवले, शिवम पाटील, कार्याध्यक्ष श्रीकांत काठे, उपाध्यक्ष मिलिंद पाटील, अनिल देठे, विल्यम कॉक्स, संजय लोखंडे, नीलेश सहाने, राहुल देवरे, सचिन पगारे ,चेतन राजपूत, जयंत देशमुख, सोनू चव्हाण, जयंत म्हैसधुणे आदी प्रदर्शन यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

दुर्मिळ छायाचित्रे बघण्याचा योग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी होत असताना उपनगर गांधीनगर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अतिशय दुर्मिळ छायाचित्रे पाहण्याचा योग या प्रदर्शनामुळे आला आणि एक ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण दस्तऐवज पाहयला मिळाला. तसेच डॉ. बाबासाहेबांनी वापरलेले कपडे व त्यांची हॅट पाहून कृतकृत्य झालो, अशी प्रतिक्रिया नाशिकचे खासदार वाजे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *