न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल
नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून
सोलापूर: सोलापूर येथील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या केली होती. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत होती. आर्थिकदृष्ट्या सक्षम, कसलीही भ्रांत अथवा कोणत्याही प्रकारची कमी नसलेल्या डॉ, शिरीष वळसंगीकर यांच्या आत्महत्या प्रकरणात नेमके काय घडले असे प्रश्न निर्माण झाले होते. आता मात्र या प्रकरणात वेगळाच अँगल समोर आला आहे. त्यांच्या रुग्णालयात प्रशासन अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने या महिलेमुळे आपण आत्महत्या करीत आहे, असे डॉ. वळसंगीकर यांनी सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले आहे. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागल्या नंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली असून, आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने केली. याचा शोध या महिलेच्या माध्यमातून घेतला जातो आहे. मनीषा मानेच्या जबाबा तुन कारणांचा उलगडा होणार आहे. या महिलेमुळे आत्महत्या करण्याची नेमकी वेळ का आली याचे कोडे उलगडण्यासाठी पोलीस कसून चौकशी करीत आहेत.