नांदगाव: प्रतिनिधी
मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी उडवा उडवी केली. त्यामुळे ग्राहकाने अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे तक्रार केली आहे तक्रारीत म्हटले आहे की, १८-०४-२०२५ रोजी मी हॉटेल शिवा पंजाब इन मध्ये जेवणासाठी गेलो होतो आणि मी ऑर्डर केलेल्या भाजीत झुरळ आढळले. त्याचा GEO TAG फोटो जोडला आहे. मी त्या भाजीत झुरळ असल्याबद्दल व्यवस्थापकाला विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की आमच्या आरोग्याची परिस्थिती अत्यंत निंदनीय आणि गंभीर आहे.
विशेष म्हणजे मी शुद्ध शाकाहारी असल्याने, हॉटेलच्या बाहेर शुद्ध शाकाहारी लिहिले असल्याने, मी जेवण ऑर्डर करताना माझ्यासोबत असा प्रकार घडला आणि मी शाकाहारी आहे, मला असे मांसाहारी अन्न खाण्यास भाग पाडले कसे जाऊ शकते? आणि त्यांनी माझ्या मुलाच्या आणि माझ्या मित्राच्या ३ लोकांच्या आरोग्याशी कसे खेळले? माझ्यासारख्या इतर शाकाहारी लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून हॉटेल आणि मालकावर कारवाई करावी. मानवी जीवनाशी खेळणाऱ्या अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी आणि मला न्याय मिळावा.अशी मागणी या ग्राहकने केली आहे.