दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील वनारवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला . पायल राजेंद्र चव्हाण असे या युवतीचे नाव आहे.नाशिक कळवण रस्त्याजवळ वाघाड कॅनॉल लगत असलेल्या राजेंद्र चव्हाण यांच्या वस्तीवर त्यांची मुलगी पायल ही सायंकाळी गुरांना घास कापणेसाठी गेली असता बिबट्याने हल्ला केला नातेवाईकांनी तातडीने धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले मात्र बिबट्या च्या हल्ल्यात पायल गंभीर जखमी झाली तिला तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांनी हळहळ व्यक्त करत वन विभागावर रोष व्यक्त केला. परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत जनावरे यांचेवर हल्ले होत आहे. काही महिन्यापूर्वी गुराखी मुलाचा हल्ल्यात मृत्यू झाला होता मात्र वनविभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थ्यांनी केला आहे. वनविभागाने पिंजरे लावत बिबट्या चा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. पायल चव्हाण ही मविप्र महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होती अभ्यासात हुशार असलेल्या पायलच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.