मधुकर झेंडे यांचे वृद्धापकाळाने निधन
सिडको विशेष प्रतिनिधी
नाशिकचा संदर्भकोष अशी अभिमानास्पद ओळख प्राप्त केलेले मधुकर झेंडे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यसमयी ते 88 वर्षांचे होते.
नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी या नात्याने ते 28 वर्षांपूर्वी महापालिकेतून सेवानिवृत्त झाले. परंतु त्यानंतरही सुमारे 10 वर्षे ते मानद अधिकारी म्हणून कार्यरत होते. मधुकर झेंडे यांच्या पश्चात मुलगा राजेंद्र, मुलगी रेखा व रत्ना, जावई प्रकाश पाटील व आल्हाद वाघ, सून, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. मधुकर झेंडे यांच्या निधनामुळे समाजातील विविध स्तरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.