मालेगाव महापालिकेकडून वृक्षांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

मालेगाव : शहरात लावण्यात आलेल्या झाडांचे संवर्धन होणे ही काळाची गरज बनली आहे. येथील महानगरपालिकेकडून शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या वृक्षांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करून ती जगवली जात आहेत. शहरातील तापमानाचा पारा हा 43 अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे कडक उन्हामुळे पाण्यावाचून अनेक ठिकाणी वृक्ष मरत असताना येथील महापालिकेने मात्र एकात्मता चौक, कॉलेज मैदानातील जॉगिंग ट्रॅकला लागून असलेली झाडे तसेच मालेगाव-सटाणा रोडवरील सिमेंट रस्ता दुभाजकाच्या मध्यभागी लावण्यात आलेली झाडे जगवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मनपाच्या पाणीटँकरद्वारे येथील झाडांना सकाळी व सायंकाळच्यावेळी पाणी देण्यात येत असल्याने ही झाडे ऐन उन्हाळ्यात टवटवीत दिसत असल्याने वृक्षप्रेमी नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *