नाशिकरोडला जुन्या वादातून युवकाची निर्घृण हत्या
एक जण गंभीर जखमी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
सिडको: दिलीपराज सोनार
नाशिकमध्ये पुन्हा एकदा जुन्या वादाला कुरापत काढून हत्या झाली असून, या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मृत तरुणाचे नाव हितेश डोईफोडे असून, त्याचा मित्र सध्या बिटको रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. या घटनेने नाशिकरोड परिसरात खळबळ उडाली असून, रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर आरोपीने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत शरणागती पत्करली.