डुबेरेत नेत्रतपासणी शिबिराचा 158 रुग्णांनी घेतला लाभ

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने डुबेरे येथील सटूआई माता सभागृहामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये 158 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. दरम्यान, गरज असलेल्या रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने सिन्नर तालुका मोतीबिंदू मुक्त अभियान राबविण्यात आले आहेत.
अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे होते. व्यासपीठावर उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल वामने, सरपंच रामनाथ पावसे, माजी सरपंच शरद माळी, शालेय समितीचे सदस्य भाऊ रखमा वारुंगसे, काशिनाथ वाजे, अशोकराव गवळी, अरुण वारुंगसे, विजय वाजे, पोलीस पाटील रामदास वारुंगसे, विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले, पर्यवेक्षक उल्हास पवार आदी उपस्थित होते. डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या पथकातील डॉ. सुमित चौधरी, डॉ. स्नेहा काळे, डॉ.लौकीक पेशट्टीवार यांनी तपासणी केली. त्यांना समन्वयक रवि सोनवणे, महेंद्र घोटेकर ,सदस्य सहकारी म्हणून मनीषा सोनवणे, निकिता कापडणीस, उत्तम साठे यांनी सहकार्य केले. आवश्यक रुग्णांना मोफत औषध उपचार देखील करण्यात आला. बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार आहे. सूत्रसंचालन पी.आर.करपे यांनी तर आभार वृषाली घुमरे यांनी मानले. शिबिर यशस्वी होण्यासाठी पर्यवेक्षक पवार, सोमनाथ पगार, सोमनाथ गिरी, डी. ए. रबडे, सुनिल ससाणे, रवी गोजरे, किशोर शिंदे, ज्ञानेश्वर कडभाने आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *