पंचवटी : वार्ताहर
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला वर्षाचा पहिला सण अक्षयतृतीया असून, या दिवसापासून खर्या अर्थाने आंब्याच्या सीझनला सुरुवात होत असते. यानिमित्ताने पेठ रोडवरील शरदचंद्रजी मार्केट यार्डात आंबा खरेदीसाठी ग्राहकांची तुडुंब गर्दी झाली होती. ग्राहकांच्या पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील फ्रूट मार्केट गर्दीने फुलून गेले होते.
अक्षयतृतीयेला घरोघरी पूर्वजांना उपवास करूच्या माध्यमातून जेऊ घालण्याची परंपरा आहे. त्यासाठी आमरसाचा नैवेद्य दाखविण्याची पारंपरिक प्रथा आहे. त्यामुळे या दिवशी आंब्यांना मोठी मागणी असते. तर जोपर्यंत पूर्वजांना जेऊ घालत नाही तोपर्यंत घरातील महिला आंबे खात नाही त्या अक्षय तृतीयाला उपास करू जेऊ घातल्यानंतर आंबे खातात. त्यामुळे अक्षयतृतीयेनिमित्त आंबे खरेदीसाठी बाजार समितीच्या फळ बाजारात दरवर्षी मोठी गर्दी होत असते. अक्षयतृतीयेच्या आदल्या दिवशीच आंबे खरेदीसाठी गर्दी केली होती.
तर बुधवार दि.30 रोजी देखील आंबा खरेदी साठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी शरदचंद्रजी मार्केट यार्ड फळ विभागात जुनागड केशर, रत्नागिरी हापूस, देवगड हापुस, बँगलोर लालबाग, विजयवाडा बदाम, आम्रपाली गुजरात, हैद्राबाद मलिका, रत्नागिरी पायरी, रत्नागिरी केशर या प्रजातींचे नवनविन आंबे उपलब्ध होती. यात हापूस व केशर या आंब्याची सर्वाधिक विक्री झाली. केशर आंबा सर्वसाधारण प्रति किलो 130 ते 200, रत्नागिरी व देवगड 200, कर्नाटक हापूस 130 ते 150 रुपये प्रतवारी दर मिळाले, अशी माहिती फळ व्यापारी भारत मोटवानी यांनी दिली.
किरकोळ विक्रेत्यांना फटका
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती समितीच्या पेठ रोडवरील फ्रूट मार्केटला फळांची होलसेल विक्री होत असते. या ठिकाणाहून शहरभरातून ठिकठिकाणी हातगाडीवर विक्री करणारे विक्रेते येथून किरकोळ विक्रीसाठी फळे घेऊन जात असतात. नाशिक शहरातील नागरिकांना फ्रुट मार्केट बद्दल माहिती असल्या कारणाने बरेच ग्राहक हे होलसेल भावाच्या कारणाने फ्रुट मार्केटला येऊन फळे खरेदी करतात. यामुळे हातगाडीवर किरकोळ विक्री करणारे फळविक्रेत्यांच्या व्यवसायाला फटका बसत आहे. बर्याच किरकोळ फळविक्रेत्यांचे उपजीविकेचे साधन आहे.
तर विक्रेत्यांवर कारवाई…
शरदचंद्र पवार मार्केट यार्डमधील होलसेल फळविक्रेत्यांना नियमानुसार पाच किलोपेक्षा कमी मालाची किरकोळ विक्री करता येत नाही. मात्र तसे होत असेल तर अशा फळविक्रेत्यांचा परवाना रद्द होऊ शकतो. असे करताना आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल.
-निवृत्ती बागुल, प्रभारी सचिव, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती