वणी : प्रतिनिधी
येथील श्री सप्तशृंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या व्हा. चेअरमनपदी चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. श्री सप्तशृंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झोटिंग यांनी आरोग्य व वैयक्तिक कारणास्तव व्हा. चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या व्हा.चेअरमनपदाच्या निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निर्णय अधिकारी सूरज ओहळ यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक झाली. या बैैैैठकीत व्हा. चेअरमनपदासाठी ज्येष्ठ संचालक प्रकाश कड यांनी चंद्रकांत सोनवणे यांचे नाव सुचविले. त्यास संचालक मंडळातर्फे संचालक गोविंद थोरात यांनी अनुमोदन दिले. यावेळी सोनवणे यांचा व्हा.चेअरमनपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सूरज ओहळ यांनी व्हा.चेअरमनपदी चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यानंतर चेअरमन सचिन खाबिया, संचालक प्रकाश कड, गोविंद थोरात, सुनील समदडिया, नंदू झोटिंग, किशोर बोरा, संतोष सातपुते, जयसिंग पवार, दीपक पारिख, कल्पना खांडे, सलमा मुल्ला, तज्ज्ञ संचालक दिगंबर पाटोळे, व्यवस्थापक संजय मोरे, संजय सोनार उपस्थित होते.