येवला : प्रतिनिधी
शहरात एका संशयिताकडून चार तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दरम्यान, संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
येवला शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल येवला शहरातील पिंजार गल्ली भागात संशयित व्यक्तीकडे तलवारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, पोलिसांनी रात्री संशयित व्यक्तीच्या घरी छापा टाकून चार तलवारी हस्तगत करून जप्त केल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.