विद्युत वाहिनीत फ्लेक्स अडकल्याने वीज पुरवठा खंडित

विद्युत वाहिनीत फ्लेक्स अडकल्याने वीज पुरवठा खंडित

नाशिक: प्रतिनिधी

महावितरणची विद्युत यंत्रणा उघड्यावर असल्याने अनेक कारणांमुळे विद्युत यंत्रणेमध्ये व्यत्यय येत असतो आणि वीज पुरवठा खंडित होऊन ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो.
आज दुपारी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे नाशिक शहरातील जेल रोडवरील पंचक उपकेंद्रातून येणाऱ्या ३३केव्ही विद्युत वाहिनीवर फ्लेक्स येऊन अडकल्याने नाशिक रोडवरील मुक्तीधाम आणि देवळाली कॅम्प या विद्युत उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत सदर फ्लेक्स वाहिनीवरून काढला. मात्र विद्युत वाहिनीवरील तारावर अडकलेला फ्लेक्स काढण्यासाठी महावितरणच्या जनमित्रांना कसरत करावी लागली.

कुठलाही वीज पुरवठा खंडित होऊ नये आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण चे कर्मचारी सातत्याने कार्यरत असतात. मात्र विद्युत यंत्रणेवर झाडे व फांद्या कोसळणे, वाहिन्यांमध्ये पतंग आणि धागे अडकणे अशा अनेक कारणामुळे सुद्धा वीजपुरवठा खंडित होतो .
अनेक वेळा जोरदार वादळी वारा व पावसामुळे झाडे, फांद्या पडून तारेवरील डिक्स इंसुलेटर वर आकाशातील वीज पडून तसेच तांत्रिक दोषामुळे यंत्रणेचे नुकसान होत असते, त्यानंतर महावितरणची यंत्रणा पूर्ववत व सुरळीत करण्यासाठी कार्य केल्या जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *