पंचवटी : वार्ताहर
मनपाच्या पश्चिम विभागाच्या वतीने शालिमार ते यशवंत महाराज पटांगण येथे अतिक्रमण मोहीम राबविण्यात येऊन ट्रकभर साहित्य जप्त करण्यात आले.
मनपा विभागीय अधिकारी चंदन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरा गांधी पुतळा, शालिमार मेन रोड, धुमाळ पॉइंट ते दहीपूल ते गाडगे महाराज पूल ते यशवंत महाराज पटांगणापर्यंत रस्त्यात अतिक्रमण केलेल्या हातगाड्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.
रस्त्यात ठेवण्यात आलेले स्टॅन्ड बोर्ड, लोखंडी टेबल, कपडे, प्लास्टिक पाल, प्लास्टिक स्टूल, प्लास्टिक टेबल, लोखंडी जाळ्या, बांबू आदींसह इतर एक ट्रक साहित्य आडगाव गोदामात जमा करण्यात आले.
या अतिक्रमण मोहिमेत पश्चिम विभागप्रमुख प्रवीण बागूल, बापू लांडगे, जावेद शेख, संजय सूर्यवंशी, संतोष पवार, मोहन भांगरे, जगन्नाथ हमारे व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.