सरावादरम्यान सायरन वाजणार, ब्लॅकआउट होणार
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव कमालीचा वाढला आहे. दहशतवाद्यांविरोधात भारत मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई कऱण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास कसे वागावे, काय उपाययोजना कराव्या यासाठी नागरी संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना बुधवारी (दि. 7) मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आला आहे. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. /-…4